तीन विद्यार्थ्यांची प्रशालेसह तालुक्यातही बाजी
सावंतवाडी । प्रतिनिधी : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून, भार्गवी अंकुश शेटवे हिने १०० टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
यावर्षी मिलाग्रीस हायस्कूलमधून एकूण १९९ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्वच्या सर्व १९९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ निकालाची टक्केवारीच नव्हे, तर गुणांच्या बाबतीतही विद्यार्थ्यांनी उच्चांक गाठला आहे प्रथम क्रमांक: भार्गवी अंकुश शेटवे १०० टक्के, द्वितीय क्रमांक कृष्णा महेश पास्ते ९९.४० टक्के तर तृतीय क्रमांक विराज नंदकिशोर राऊळ ९९ टक्के यांनी प्राप्त केला असून मिळालेल्या या घवघवीत यशाबद्दल विद्यालय प्रशासनाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. या यशाबद्दल मिलाग्रीस हायस्कूलच्या व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













