दोडामार्ग तालुक्याचा दहावीचा निकाल ९७.४८ टक्के; चिन्मयी खानोलकर तालुक्यात प्रथम

दोडामार्ग | सुहास देसाई :महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) निकालात दोडामार्ग तालुक्याने घवघवीत यश संपादन केले आहे. तालुक्याचा एकूण निकाल ९७.४८ टक्के लागला असून, चिन्मयी जयसिंगराव खानोलकर हिने तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.

तालुक्यातील

निकालाच्या गुणवत्

प्रथम: चिन्मयी जयसिंगराव खानोलकर दोडामार्ग हायस्कुल तर

द्वितीय: श्री राजेंद्र देसाई करुणा सदन स्कुल साठेली भेडशी

तृतीय: चैतन्य मंदार फातर्फेकर

न्यू इंग्लिश स्कुल भेडशी असे अनुक्रमे नंबर पटकवले आहेत

यावर्षी दोडामार्ग तालुक्यातून एकूण ३१८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ३१७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. जाहीर झालेल्या निकालात ३०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तालुक्याची निकालाची टक्केवारी ९७.४८ इतकी आहे.

११ शाळांचा १०० टक्के निकाल:

तालुक्यातील शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचावलेला पाहायला मिळत आहे. तालुक्यातील एकूण १६ माध्यमिक शाळांपैकी ११ शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.