ओटवणेत आज यक्ष चंडिका युद्ध दशावतार नाट्य प्रयोग

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे येथे जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्त ओटवणे महायुती आणि विक्रांत सावंत मित्रमंडळ यांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून,यनिमित्त २७ मे ठीक ७. ३० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू, ८. ०० सिंधू कलाकार मंच ऑर्केस्ट्रा,ठीक ९. ०० वाजता श्री सातेरी महिला दशावतार नाट्य मंडळ पावशी यांचा यक्ष चंडिका युद्ध हा दशावतार नाट्य प्रयोग साजरा होणार आहे तर याच नाटका दरम्यान विक्रांत सावंत यांचा वाढदिवस उशिरा मध्यरात्री साजरा केला जाणार आहे तरी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचं तसेच उपस्थित राहण्याच आवाहन भारतीय जनता पक्ष तसेच महायुती, विक्रांत सावंत मित्रमंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.