टच संस्था मुंबईतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप

चिपळूण (प्रतिनिधी) : पंधरागाव विभाग जनता माध्यमिक शिक्षण संस्था संचलित यशवंत विद्यालय कनिष्ठ कला वाणिज्य महाविद्यालय धामणंद येथे मुख्याध्यापक एस जी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टच संस्था मुंबई यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. पंधरा गावातील धामणंद येथील माजी विद्यार्थी प्रफुल्ल दाजीराव पालांडे यांच्या सहकार्याने यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण संस्थेचे सचिव संदीप म्हापदी यांनी केले. तसेच एक दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन धामणंद गावचे सुपुत्र प्रकाश सकपाळ तसेच प्रा. भांदिगरे यांनी आपण सर्वजण स्पर्धेच्या युगात जगत आहोत. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इच्छाशक्ती महत्त्वाचे आहे तसेच टच संस्थेचे स्वयंसेवक श्रीरंग मोहिरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी शैक्षणिक साहित्यामध्ये लॉंग बुक वही ग्राफ पेपर पेन्सिल कंपास पेटी कलर बॉक्स इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले यावेळी पालकांची उपस्थिती होती. यावेळी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक विजय देसाई, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सचिन पालांडे, सदस्य विठ्ठल जाधव, उमेश पालांडे, टच संस्था प्रोजेक्ट कॉडीनेटर,जया कांबळे, मनिष भोसले तसेच शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता सावंत यांनी तर आभार अभिजित भोये यांनी मानले.