भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांचा सामाजिक उपक्रम
लांजा (प्रतिनिधी) : आपल्या नेत्याचा वाढदिवस अनेक जण वेगवेगळ्या मार्गाने साजरा करत असतात. अशाच प्रकारे भाजपाचे लांजा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांनी लांजा महिलाश्रम या संस्थेतील मुलींना कपडे वाटप करून राज्याचे मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस साजरा केला.
राज्याचे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांचा आज मंगळवारी २३ रोजी रोजी वाढदिवस आहे. आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा करत असताना हार तुरे देऊन किंवा पेढे वाटून साजरा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने समाजातील गरजूंना त्याचा फायदा होईल हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भाजपा तालुका अध्यक्ष शैलेश खामकर यांनी लांजा महिलाश्रम या संस्थेतील मुलींना कपडे वाटप करून अनोख्या पद्धतीने आपल्या नेत्याचा वाढदिवस साजरा केला.
आज मंगळवारी सकाळी लांजा महिलाश्रम येथे झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी शैलेश खामकर यांच्यासह, उत्तर मंडळ अध्यक्ष विरारमध्ये, माजी नगरसेवक संजय यादव, भास्कर खामकर, रवींद्र राणे, अमेय गुरव यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच महिलाश्रम कर्मचारी आणि विद्यार्थिनी उपस्थित होते.










