मसुरे (प्रतिनिधी):
रामगड होळीवाडी येथील रहिवासी वसंत तुकाराम सोलकर (८२ वर्षे ) यांचे निधन झाले. तात्या या टोपण नावाने त्यांची गावात ओळख होती. तत्कालीन काळात सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान मोठे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे, पुतणे असा मोठा परिवार आहे. युवा कार्यकर्ते प्रमोद सोलकर, प्रवीण सोलकर यांचे ते वडील, नॅशनल तायकोंदोपटू निशा सोलकर यांचे आजोबा तर साकेडी येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम गुरव यांचे ते सासरे होत.













