सरस्वती विद्यालय आरवली-टाक हायकुल मध्ये मनसेकडून विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप..

वेंगुर्ले : प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वेंगुर्ला यांच्या वतीने सरस्वती विद्यालय, आरवली-टाक येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचा लाभ शाळेतील एकूण ६५ विद्यार्थ्यांना झाला.

यावेळी मनसेचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष सनी बागकर, आरवली-सागरतीर्थ विभागाध्यक्ष विनायक फटनाईक, टाक शाखाध्यक्ष मंदार चोपडेकर तसेच गोरेगाव (मुंबई) विभागाध्यक्ष घनश्याम परब उपस्थित होते.

याप्रसंगी मनसे पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देत भविष्यातही शाळेला आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमाबद्दल मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आभार मानले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरात स्वागत करण्यात आले.