गौरव पोंक्षे माखजन:
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने आणि उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांच्या उपस्थितीत अतिशय नियमबद्ध,व सूत्रबद्ध पद्धतीने वरिष्ठ लिपिक,कनिष्ठ लिपिक,शिपाई,प्रयोगशाळा सहाय्यक आदि शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्यात आले आहे.अगदी नियमात प्रक्रिया राबवली गेल्याने शांततेत प्रक्रिया झाली.
जिल्ह्यात ३ वरिष्ठ लिपिक अतिरिक्त होते त्यांपैकी दोघांचे समयोजन झाले.२५ कनिष्ठ लिपिक अतिरिक्त होते त्यातील २४ कनिष्ठ लिपिकांचे समयोजन झाले.१३ प्रयोगशाळा सहाय्यक अतिरिक्त होते त्यातील ४ प्रयोगशाळा सहाय्यकांचे समयोजन झाले.तर ८ न्यायप्रविष्ठ केस असल्याने त्यांचे होऊ शकले नाही.
तर २७ शिपाई अतिरिक्त होते तर २७ जणांचे समयोजन झाले.
तर अशाच पद्धतीने १२ जून ७८ शिक्षकांच समयोजन करण्यात आले.शिवाय तेरा उर्दू माध्यमाच्या शिक्षकांचे समायोजन माध्यमिक विभागाकडे पदे रिक्त नसलेने, जिल्हा परिषदेकडे करणेबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी पत्र दिले आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वांसमोर स्क्रीन वरती शाळा मागण्याची मुभा मिळाल्याने व कोणत्याही प्रकारे नियम बाह्य प्रक्रिया न झाल्याने शिक्षणाधिकारी दीपक मेंगाने,उपशिक्षणाधिकारी संदेश कडव यांचे उपस्थित शिक्षकेतर कर्मचारी आवर्जून आभार मनात होते.प्रक्रिया पारदर्शक राबवली गेल्याने शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले.













