साखर माध्यमिक विद्यालयात “टच”संस्था मुंबईच्यावतीने शैक्षणिक साहित्य वितरण

चिपळूण (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील साखर माध्यमिक विद्यालयात,”टच “संस्था मुंबई यांच्यावतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण संस्थेचे सचिव संदिप म्हापदी होते.
मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव, प्रमुख अतिथी म्हणून धामणंदचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पा पालांडे, विष्णू कदम तसेच जय महालिंग क्रीडा मंडळ धामणंदचे अध्यक्ष अनिकेत म्हापदी, सचिव सूरज सुर्वे, सल्लागार वैभव पालांडे, शिवम कदम, व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुधाकर जाधव, दिपक जानकर, अध्यापक प्रभाकर राजमाने, रवींद्र गावकर उपस्थित होते. मुख्याध्यापक शरदचंद्र जाधव यांनी मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच प्रास्ताविकातून “टच” संस्थेच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली. विशेषत: या स्तुत्य उपक्रमात समन्वयाची भूमिका निभावणारे धामणंद गावचे सुपूत्र प्रफुल्ल दाजी पालांडे यांचे योगदान प्रास्ताविकातून अधोरेखित केले.मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. कु.मोहिनी हिलम,सिमरन मोहिते या विद्यार्थ्यांनी मनोगतातून “टच” संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आप्पा पालांडे, विष्णु कदम, वैभव पालांडे, संदीप म्हापदी, सुधाकर जाधव यांनी मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर राजमाने व आभार रवींद्र गावकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यास विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारीवर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.