वैभववाडी l प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी वैभववाडी व सिंधु रक्त मित्र प्रतिष्ठान, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता भारतीय जनता पार्टी कार्यालय, वैभववाडी येथे महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिरात भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच रक्तदाते यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदानाच्या या सामाजिक उपक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे वैभववाडी तालुका अध्यक्ष सुधीर नकाशे यांनी केले आहे.












