वैभववाडी l प्रतिनिधी : आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दि.३ जानेवारी रोजी होत आहे. यानिमित्ताने मंदीरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात तयारीला वेग आला असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी पौष पौर्णिमेला आचिर्णे गावच्या श्री रासाई देवीचा जत्रोत्सव संपन्न होतो. यावर्षीचा हा जत्रोत्सवाचा सोहळा शनिवारी ( ३जाने. ) होत आहे. जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळी ७ वाजता महापूजा व महाआरती होणार आहे. त्यानंतर सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, तर दुपारी १.३० वाजता ओटी भरणे कार्यक्रम सुरू होणार आहे. 3 ते 6 वा. होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा जागर स्त्री शक्तीचा ), सायंकाळी 6 वा. सुस्वर गायनाचा कार्यक्रम, सायंकाळी 7 वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा, 10.30 वा. बक्षीस समारंभ, 11 वा. देवीची पालखी मिरवणूक, रात्री 12 वा. दशावतार पार पडणार आहे. तरी या उत्सवाला मोठया संख्येने भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती आचिर्णे यांनी केले आहे.











