स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २९ रोजी धार्मिक कार्यक्रम!

मसुरे | झुंजार पेडणेकर
श्री श्री १०८ महंत मठाधीश प.पू.सदगुरु श्री गावडेकाका महाराज यांच्या संकल्पेनेतून साकार झालेल्या श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट येथे २९ जुलै रोजी आषाढ पौर्णिमा(गुरु पौर्णिमा ) निमित्त श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ :०० वा. श्री स्वामी समर्थ महाराज मूर्ति वर आणि स्वामी पादुकांवर जलाभिषेक आणि दुग्धाअभिषेक आणि पूजन, सकाळी ९ : ०० वा. श्री सत्यनारायण महापूजा, सकाळी ११ वा. नैवेद्य आणि आरती, दुपारी १ :०० वा.महाप्रसाद-अन्नदान, सायंकाळी ४:१५ वा. सुस्वर भजन, सायंकाळी ७ :०० वा. दैनंदिन आरती. भाविक-भक्तांनी दर्शन, तीर्थप्रसाद आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मठाच्या वतीने करण्यात आली आहे.