गो-संरक्षा व राष्ट्रीय सन्मानासाठी ‘गो सन्मान आव्हान अभियान’; महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले स्मरणपत्र

रत्नागिरी प्रतिनिधी
​संपूर्ण भारतातील देशी गोवंशाची (अखिल वेदलक्षणा गोमाता) विधिवत सेवा, पूर्ण सुरक्षा आणि त्यांना ‘राष्ट्रीय सन्मान’ मिळवून देण्यासाठी तसेच केंद्रीय कायदा व स्वतंत्र गो-पालन मंत्रालय स्थापन करण्यासाठी ‘गो सन्मान आव्हान अभियान’ अधिक तीव्र करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देशाच्या राष्ट्रपती, माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या नावे स्मरणपत्र देण्यात आले आहे. यापूर्वी २७ एप्रिल २०२६ रोजी देशभरातील ५,१०० तालुक्यांमधून सव्वा पाच कोटींहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे प्रार्थना पत्र सरकारला सादर करण्यात आले होते. मात्र, या विषयावर प्रशासनाकडून समाधानकारक कारवाई पुढे न सरकल्याने, सरकारचे पुन्हा लक्ष वेधण्यासाठी हे पत्र सुपूर्द करण्यात आले आहे. पर्यावरण संरक्षणासाठी या सर्व स्वाक्षऱ्यांचा डेटा पेन ड्राईव्हमध्ये (सॉफ्ट कॉपी) जोडून रत्नागिरीसह महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये गो-भक्त आणि नागरिकांच्या वतीने हे निवेदन प्रशासनाकडे सोपवण्यात आले आहे.