ओटवणे(प्रतिनीधी) ओटवणे मांडवफातरवाडी येथे नव्याने स्थापन झालेल्या संकल्प सेवा संघाकडून मांडवफातर वाडीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य महेश परब, ग्राम पंचायत सदस्या अस्मिता भगत,शाळा व्यवस्थापन अध्यक्षा वर्षा पनासे, उपाध्यक्षा महिमा वारंग, दाजी सावंत, कांचन भगत,शिक्षक श्रीम. तुळसकर, श्री परब, श्री होडावडेकर, श्रीम गावकर, संकल्प सेवा संघ पदाधिकारी शंकर म्हापसेकर, शंकर वर्णेकर, प्रकाश पनासे, समीर गोडकर, लक्ष्मण वर्णेकर, प्रसाद पनासे, भिमसेन नाईक, मिलिंद म्हापसेकर, महेंद्र वारंग, उदय सावंत, रामचंद्र पनासे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी १० वी व १२ वीतील गुणवंत विद्यार्थी श्रुती पनासे, पूनम सावंत, स्नेहा वारंग, सहदेव गावडे, सतीशा वर्णेकर, संजना नाईक, रेश्मा नाईक, जागृती बिले यांच्यासह प्राथमिक शाळेतील ३४ गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.
यावेळी शंकर म्हापसेकर आणि प्रकाश पनासे यांनी विद्यार्थांना आणि अंगणवाडीतील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्वल पनासे याने तर आभार विष्णु सावंत यांनी मानले.












