मसुरे | झुंजार पेडणेकर : पळसंब आणि श्रावण भागात गव्यांचा वावर असल्या बाबत चे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वनविभागाच्या अधिकारी वर्गाने पळसंब सरपंच श्री. चंद्रकांत गोलतकर यांची पाळसंब ग्रामपंचायत येथे भेट घेत घ्यावयाची खबरदारी तसेच शेतकरी नुकसान बाबत माहिती घेतली. मालवण वनपाल श्री. सदानंद परब, वनरक्षक श्री. लक्ष्मण आमले यांनी गवारेडा व इतर वन्यप्राणी यांच्याकडून होणाऱ्या नुकसान भरपाई संदर्भात चर्चा केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य श्री. सत्यवान तेजम उपस्थित होते. वन्यप्राण्याकडून नुकसान झाल्यास नुकसानग्रस्त शेतीचा शेतकऱ्यासहित फोटो, 7/12, नकाशा, हमीपत्र, आधारकार्ड, बँक पासबुक या कागद पत्रासहित प्रस्ताव करावा असे ते म्हणाले. नुकसानी भरपाई मिळेल असेही सांगितले. सरपंच गोलतकर यानी आभार मानले.










