कुडाळ: गावराई तेलीवाडी येथील रहिवासी अशोक सदाशिव नेरुरकर (वय ७४) यांचे गुरुवारी, ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने कसाल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशोक नेरुरकर हे आध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासक व जानकर अतुल नेरुरकर तसेच जितेंद्र नेरुरकर यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना आणि नातू असा मोठा परिवार आहे.











