चॅम्पियन ट्रॉफीवर नाव कोरले;
१३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
स्वप्निल कदम-कुडाळ :
सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडेच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करत सिंधुदुर्ग जिल्हा अजिंक्यपद चॅम्पियन ट्रॉफी २०२६ पटकावली. दि. २ ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेत शाळेच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारांत चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत एकूण १३ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंमध्ये सुशांत अनिल परब, सक्षम संतोष तांबे, वेदिका विलास लाड, सानिका सुभाष सावंत, आयेशा उमेश घाडीगावकर, तृषा महेश कानेकर, आर्या आनंद परब, प्रसाद शिवराम घाडीगावकर आणि अमेय गोविंद घाडीगावकर यांचा समावेश आहे.
तसेच गोपाळ संदीप घाडीगावकर, गणेश भास्कर घुरी, उत्कर्ष दीपक सावंत, विधेश मंगेश सरंगले आणि अथर्व महेश घाडीगावकर यांनी तृतीय क्रमांक मिळवला. तर आयेशा उमेश घाडीगावकर, आर्या आनंद परब, सानिका सुभाष सावंत, वेदिका विलास लाड आणि सुशांत अनिल परब यांनी प्रथम क्रमांक पटकावत शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
या उल्लेखनीय यशाबद्दल माध्यमिक शिक्षण समिती, जांभवडे पंचक्रोशीचे चेअरमन सुभाषजी मडव, व्हाईस चेअरमन बा. शी. परब गुरुजी, सेक्रेटरी एकनाथ चव्हाण गुरुजी, सहसेक्रेटरी रामदास मडव, संस्था सदस्य मनोहर गावकर, लवू घाडी, आनंद सावंत, दिलीप तेली, प्रशालेचे प्राचार्य प्रा. अनिल कासले, पर्यवेक्षक सावंत सर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तसेच मार्गदर्शक शिक्षक खरात सर, कदम सर, बागुल सर आणि सौ. राणे मॅडम यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचा कठोर सराव, शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन आणि पालकांचे लाभलेले सहकार्य यामुळे हे यश संपादन झाले. जांभवडे हायस्कूलच्या या दैदिप्यमान कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.










