आचरा पोलीस स्टेशनच्या मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती

आचरा-अर्जुन बापर्डेकर
आचरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस उप निरीक्षक सौ मिनाक्षी देसाई यांना पोलीस उपनिरीक्षक पदी बढती मिळाली आहे.
नेहमी हसतमुख आणि
सहकार्याची भावना असलेल्या पोलीस कर्मचारी म्हणून आचरा पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी देसाई यांनी महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न,सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थ संदर्भात जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये विशेष प्रयत्न केले होते.त्यांना उपनिरीक्षक पदी बढती मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे.