गौरव पोंक्षे माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आंबव पोंक्षे गावांत श्री सूर्यनारायण मंदिरात श्रावण महिन्यात केला जाणारा श्रावणी हा धार्मिक विधी,संस्था अध्यक्ष अशोक पोंक्षे यांच्या मार्गदर्शनात उत्साहात संपन्न संपन्न झाले.
यावेळी यज्ञोपवीत(जानवे) नवीन धारण केले जाते. यज्ञोपवीताला धार्मिकदृष्ट्या पवित्र मानले जाते. वर्षभर वापरलेले जुने यज्ञोपवीत काढून,या विधी नंतर नवीन यज्ञोपवीत धारण केले जाते. हा विधी शुद्धीकरण, धार्मिक कर्तव्यांची आठवण आणि संकल्प यांचे प्रतीक मानला जातो.
यज्ञोपवीत परिवर्तनाचा पारंपारिक धार्मिक विधी श्रावण महिण्यात केला जातो म्हणून त्याला ‘श्रावणी’असे देखील म्हटले जाते.यावेळी परिसरातील ब्राह्मण वृंद उपस्थित होते.
श्री सूर्यनारायण मंदिरात गेली अनेक वर्षे हा विधी मोठ्या भक्तीभावाने केला जातो.












