स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देवगड येथे कॅरम स्पर्धेचे आयोजन; महिला स्पर्धकाचा उत्स्फूर्त सहभाग
देवगड, १६ ऑगस्ट : ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हनुमान युवक क्रीडा मंडळ, देवगडच्या वतीने १५ ऑगस्ट रोजी प्राथमिक शिक्षक भवन, देवगड येथे खुल्या व शालेय गटातील कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत खुल्या गटातून विकास वसंत कुलकर्णी यांनी, तर शालेय गटातून शुभम अनिकेत पेडणेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रकाश जनार्दन गोगटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, उद्योजक हनिफशेठ मेमन, सचिव शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप, दत्तात्रय चव्हाण, विनोद मेस्त्री, संतोष गुडेकर, शिवप्रसाद पेडणेकर, कमलाकांत भडसाळे, हिंदू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा देवगडचे प्रकाश जाधव व राजेंद्र हिंदळेकर आदी उपस्थित होते.
खुल्या गटात विकास वसंत कुलकर्णी यांनी प्रथम, तर योगेश आनंदा कोळी यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. चित्तरंजन गोविंद बाणे व अमोल अनिल पाटकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. शालेय गटात शुभम अनिकेत पेडणेकर प्रथम, गौरांग उमेश नाईकधुरे द्वितीय, तर वेदांत संतोष नाईकधुरे व शावेज कमालुद्दीन शेख यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
विशेष बाब म्हणजे खुल्या गटात देवगड हायस्कूलच्या शिक्षिका ए. पी. किरकिरे या एकमेव महिला स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे उपस्थितांनी कौतुक केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे, उपाध्यक्ष उल्हास मणचेकर, सचिव शरद लाड, माजी अध्यक्ष विजय जगताप तसेच सदस्य विनोद मेस्त्री, संतोष गुडेकर व कमलाकांत भडसाळे यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार मंडळाचे अध्यक्ष विलास रूमडे यांनी मानले, तर सूत्रसंचालन सचिव शरद लाड यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विलास रूमडे, उल्हास मणचेकर, शरद लाड, विजय जगताप, विनोद मेस्त्री, श्रीकांत बिडये, गुडेकर, कमलाकांत भडसाळे, शिवप्रसाद पेडणेकर, योगेश कोळी, मेषक राणे, मनीष दळवी व सुशील रूमडे यांनी विशेष परिश्रम घेतले.













