संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ‘कृष्ण हनुमान युद्ध’ दशावतारी नाटक

सह्याद्री फाउंडेशनतर्फे गोविंद चित्रमंदिर येथे आयोजन 

सावंतवाडी: सह्याद्री फाउंडेशन सावंतवाडीच्या तीने फाउंडेशनचे माजी अध्यक्ष श्री. संजू परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ, दोडामार्ग यांचा ‘कृष्ण हनुमान युद्ध’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

हा दशावतारी नाट्यप्रयोग येत्या १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे पार पडणार आहे. तरी सावंतवाडी व परिसरातील सर्व नाट्यप्रेमी मंडळींनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या नाट्यप्रयोगाचा आनंद घ्यावा, असे नम्र आवाहन सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. सुनील राऊळ आणि विद्यमान अध्यक्ष श्री. रवींद्र मडगावकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.