केंद्र व राज्य शासन पुरस्कृत विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभार्थ्यानी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पध्दतीने हयात प्रमाणपत्र सादर करावीत- तहसीलदार विकास गंबरे यांचे आवाहन

राजापूर प्रतिनिधी: केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजने अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे DIGITAL LIFE CERTIFICATE (DLC) म्हणजे हयातीचे प्रमाणपत्र विनाशुल्क ऑनलाईन जनरेट करणेकरीता ग्राम विकास मंत्रालयाने BENEFICIARY SATYAPAN APP विकसीत केलेले आहे. तरी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थींनी त्यांचे हयातीचे प्रमाणापत्र ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पध्दततीने जनरेट
करावीत असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.
योजने अंतर्गत लाभ घेणा-या लाभार्थ्यांचे DIGITAL LIFE CERTIFICATE (DLC) सदरच्या प्रणालीचा वापर करुन इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ अर्थसहाय्य योजना, संजय गांधी निराधार योजना व श्रवणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजने अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना शासनाकडून दरमहा असहाय्य मिळत आहे अपेक्षित होते. परंतू अदयापही ज्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र ऑनलाईन जनरेट केलेले नाही अशा शिल्लक राहिलेल्या लाभार्थ्यांनी ते प्रमाणापत्र ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन पध्दततीने जनरेट करावयाची आहेत.
सदरचे हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करण्याकरीता संबंधित लाभार्थी, लाभार्थीचे आधारकार्ड व मोबाईल नंबर आवश्यक आहे. सदरचे हयातीचे प्रमाणपत्र संबंधित लाभार्थी अगर त्यांचे नातेसंबंधातील कोणीही व्यक्ती ज्या व्यक्तीकडे Android मोबाईल आहे, ती व्यक्ती देखील तिच्या मोबाईलमध्ये Beneficiary Satyapan App आणि Aadhar Face Rd ही Appliciations Download करुन हयातीचे प्रमाणपत्र जनरेट करु शकतात.
तरी, संबंधित लाभार्थी यांनी हयातीचे प्रमाणपत्र विनाशुल्क ऑनलाईन जनरेट करणेकरीता ग्राम विकास मंत्रालयाने BENEFICIARY SATYAPAN APP विकसीत केलेल्या प्रणालीचा वापर करुन ऑनलाईन जनरेट करणेचे आहे.
ज्या लाभार्थ्यांना अथवा त्यांचे नातेवाईकांना सदरचे हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाईन करण्याकरीता अडचण येत असेल अथवा करता येत नसेल त्यांनी त्यांच्या गावच्या संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे, ग्रामपंचायत कार्यालयाकडील संगणक परिचालक कर्मचारी अथवा तहसिलदार कार्यालय राजापूर येथील संजय गांधी शाखेमध्ये तसेच महा ई सेवा केंद्रामार्फत केल्यास पन्नास रूपयें अदा करुन ३१ ऑगस्ट २०२६ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी समक्ष हजर राहून हयातीचे प्रमाणपत्र भरणेकरीता संपर्क करावा व महसूल प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहनही गंबरे यांनी केली आहे.