अंकुश जाधव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चा कोकण विभाग सहसंपर्क प्रमुख पदी निवड
सावंतवाडी :
भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विश्वजित गायकवाड आणि सरचितणीस तथा प्रदेश प्रभारी ॲड. माधवीताई यांनी ही नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांची भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, त्यांच्यावर कोकण विभाग सहसंपर्क प्रमुख पदाचीही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
अंकुश जाधव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती म्हणून काम करताना त्यांनी समाजकल्याण विभाग सक्षम करून त्याला विकासाच्या शिखरावर पोहोचवले. त्यांच्या या धडाडीच्या कार्यपद्धतीमुळे प्रशासनात आणि सर्वसामान्य जनतेत त्यांची एक वेगळी व सक्षम ओळख निर्माण झाली आहे.
त्यांच्या या नियुक्तीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अंकुश जाधव यांचे विशेष अभिनंदन केले आहे. जिल्हा परिषदेचे सभापती म्हणून त्यांनी केलेले प्रभावी काम आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व समाजघटकांना एकत्र आणून भाजपचे विचार व कार्य तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या याच उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही नवीन जबाबदारी दिल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.











