राजापूर प्रतिनिधी : सागंली जिल्हयातील शिराळा तालुक्यातील मांगरूळ गावचे रहिवाशी व सामाजिक कार्यकर्ते वसंत दगडू कुंभार (६९) यांचे गुरूवारी अल्पशा आजाराने निधन झाले. राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी अभिजित कुंभार यांचे ते वडील होत.
एक शांत, संयमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. मांगरूळ गावच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात त्यांचा कायमच सक्रिय सहभाग असे. गुरूवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी कुंभार यांच्या मांगरूळ येथील निवासस्थानी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या प्रश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, सुन, जावई, असा परिवार आहे. त्यांच्यावर गुरूवारी सायंकाळी मांगरूळ येथील स्मशानभूमीत अत्यंसंस्कार करण्यात आले.













