एकजण गंभीर जखमी : देवली येथील घटना
मालवण : प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील देवली शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ मार्गांवर मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण मोटरसायकल अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. देवली कनकदेव येथे छोट्या पुलाच्या जवळ हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कुंभारमाठ कातकरी वस्ती येथील कुटुंबातील हे तिघेजण युवक देवली येथे गेले होते. यां दरम्यान मार्गांवर हा अपघात झाला. या दुर्घटनेत ओंकार निकम (वय १२) आणि राजू अर्जुन निकम (वय१० ) यांचा मृत्यू झाला. या अपघातात सचिन निकम हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी गोवा बांबुळी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच तत्परतेने घटनास्थळी धाव घेत. प्रो. डीवायएसपी शेलार , एपीआय गणेश माने, एपीआय पंडित पाटील, पीएसआय भगत, पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, कॉ. पाटील यांनी अपघाताची माहिती घेतली. शिवसेना तालुका प्रमुख मंदार लुडबे, दरम्यान माजी नगरसेवक आप्पा लुडबे
यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेत मदतकार्य. केले
अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.












