मसुरे | झुंजार पेडणेकर :
बांदिवडे येथील शाळा क्रमांक २ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराचा ८७ ग्रामस्थांनी लाभ घेतला. ग्रामस्थांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमासाठी डॉ. निखिल सावंत व सावंत परिवाराने विशेष सहकार्य केले. तसेच बांदिवडे परिसरातील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
ग्रामस्थांना त्यांच्या आरोग्याबाबत आवश्यक माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉ. निखिल सावंत व सावंत परिवाराचे आयोजकांनी आभार मानले.












