वेंगुर्ले गाडीअड्डा येथील वेंगुर्ले च्या राजा चरणी आम. दीपक केसरकर लीन…

 

वेंगुर्ले : प्रतिनिधी

वेंगुर्ले गाडीअड्डा येथील सार्वजनिक गणेशोत्सवाला आम. दीपक केसरकर यांनी भेट देऊन ते वेंगुर्ले च्या राजा चरणी लीन झाले.

यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित म्हापणकर यांनी त्यांचे स्वागत केले.

यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, पंचायत समिती उपसभापती सचिन देसाई, तालुकाप्रमुख बाळा दळवी, नगरसेविका लीना म्हापणकर, रिया केरकर, शहर प्रमुख अजित राऊळ, तसेच पंकज शिरसाट, सत्यवान साटेलकर, स्वप्नील साळगावकर, सिद्धार्थ सामंत, गोपाळ फोवकांडे, वेंगुर्लेकर, सुहास मांजरेकर व मंडळाचे सदस्य उपस्थित होते.