बांदा (प्रतिनिधी) : बांदा पोलीस स्टेशन आवारातील श्री पाटेश्वर मंदिरातील २१ दिवसीय गणेशोत्सवानिमित्त सालाबाद प्रमाणे यावर्षीही भव्य ‘डबलबारी भजनाचा जंगी सामना’ आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८ वाजता हा सामना पार पडणार आहे.
हा सामना श्रीहनुमान प्रसादिक भजन मंडळ वर्दे कुडाळचे बुवा गुंडू सावंत आणि श्री लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ भरणी कुडाळचे बुवा विनोद चव्हाण यांच्यात होणार आहे. बुवा गुंडू सावंत यांना पखवाज वादक विराज बावकर,तबलावादक प्रदीप वाळके यांची साथसंगत राहील.
तर बुवा विनोद चव्हाण यांना पखवाज वादक तुषार लोट आणि तबलावादक अभिषेक सुतार यांची साथसंगत राहील. सर्व भजन प्रेमींनी डबलबारी भजनाच्या सामन्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी केले आहे.











