लांजा तालुक्याच्या हद्दीतील निवसर रेल्वे स्टेशन या दरम्यानची घटना
लांजा (प्रतिनिधी) बेंगलोर ते मुंबई असा रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या बॅग मधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा २ लाख ६२ हजार 22 रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना निवसर रेल्वे स्टेशन दरम्यान घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरोधात ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लांजा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुडविन जाॅसी डिसोजा( मूळ राहणार बेंगलोर सध्या नोकरी निमित्त मुंबई )हे दिनांक १९ ऑगस्ट रोजी बेंगलोर ते मुंबई असा प्रवास करत होते .दिनांक २० ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास लांजा तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या निवसर रेल्वे स्टेशन यादरम्यान गुडविन डिसोजा हे आपली बॅग सीटवर ठेवून बाथरूमला गेले होते. या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा दोन लाख ६२ हजार २२ रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र याबाबत त्यांना माहिती नव्हती. वसइ येथे त्यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत वसई येथे तक्रार केली. त्यानंतर रत्नागिरी पोलीस ठाण्यातून हा गुन्हा लांजा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास पोलीस हे.काॅं.नासीर नावळेकर हे करत आहेत.












