हिंदळे भंडारवाडा येथे श्रमदानातून वनराई बंधारा!

 मसुरे | झुंजार पेडणेकर
ग्रामपंचायत हिंदळे यांचेमार्फत
पाणी अडवा, पाणी जिरवा’ या मोहीमेअंतर्गत देवगड तालुक्यातील हिंदळे भंडारवाडा येथील श्री काशी विश्वेश्वर मंदिर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानातून कच्चा बंधारा बांधला. हिंदळे ग्रामोन्नती मंडळ आणि विश्वेश्वर मांड मंडळाच्या पुढाकाराने राबवलेल्या या स्तुत्य उपक्रमांस मंडळाच्या सदस्यांनी श्रमदान केले.

पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.ग्रामस्थांच्या या एकता आणि श्रमदानाच्या जोरावर बंधाऱ्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुनीलभाई पारकर, सरपंच मकरंद शिंदे, ग्रामपंचायत सदस्या दिप्ती खोत, अंगणवाडी कर्मचारी वैशाली तेली व प्रज्ञा हिंदळेकर उपस्थित होते.

तसेच हिंदळे ग्रामोन्नती मंडळाचे समील हळदणकर, राहुल पारकर, बाळा वानिवडेकर, दिनार वळंजू, बबन हळदणकर, परेश खोत, योगेश पाटील, आदित्य आचरेकर, जीजी खोत, कुरकुंदे, सचिन हळदणकर, मंगेश हिर्लेकर, दिनेश पारकर आणि संजय हळदणकर यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय ग्रामपंचायत अधिकारी श्री कुबल , कृषी अधिकारी, भंडारवाडा येथील शिक्षक श्री. धुरत, बांदल, मयेकर मॅडम आणि शाळेचे विद्यार्थीही या श्रमदान मोहिमेत सहभागी झाले होते. सरपंच मकरंद शिंदे यानी आभार मानले.