भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ला यांच्या कडून शहरातील भटवाडी येथे बांधला बंधारा…

वेंगुर्ले : प्रतिनिधी
पालकमंत्री नितेश राणे यांनी संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेता पाणी जपून वापरा आणि आपल्या जवळ ओहोळ, नदी, पाणथळ जागा येथे वाहत असलेले पाण्याचे साठे बंधारे घालून अडवण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार भाजपा युवा मोर्चा वेंगुर्ला यांच्या कडून आज रविवारी वेंगुर्ले शहरातील भटवाडी येथे बंधारा घालून पाणी अडविण्यात आले.

यावेळी वेंगुर्ले भाजपा तालुकाध्यक्ष पपू परब, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक प्रणव वायगणकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष तथा नगरसेवक प्रितम सावंत, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ सावंत, युवा मोर्चा पदाधिकारी संजय सावंत, महेश सावंत, अरुण सावंत, कृष्णा सावंत, साईप्रसाद सावंत, प्रकाश सावंत, शुभम सावंत, कपिल सावंत,भूषण सावंत, प्रवीण सावंत, नवनाथ सावंत,प्रतिक सावंत, अनंत सावंत, कौस्तुभ सावंत, राजाराम सावंत, सुभाष सावंत, युवा मोर्चा चिटणीस संतोष सावंत ,राजवीर सावंत , प्रथमेश सावंत,मारुती दोडनशेट्टी आदी या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते.