
मसुरे | झुंजार पेडणेकर
डॉ. जी. पी. रत्नपारखी यांच्या ‘गुरुकृपा हार्ट फाउंडेशन’तर्फे आयोजित नववी ‘कार्डिओकॉन परिषद २०२६’ मुंबईतील हॉटेल ‘द ललित इंटरनॅशनल’ येथे अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडली. या भव्य वैद्यकीय परिषदेला राज्यभरातून १,४०० हून अधिक डॉक्टर आणि प्रतिनिधींनी उपस्थिती लावली होती.
या परिषदेचे उद्घाटन मुंबई भाजप अध्यक्ष श्री. अमित साटम यांच्या शुभहस्ते झाले. या सोहळ्याला केंद्र सरकारचे सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री श्री. रामदास आठवले हे ‘विशेष अतिथी’ म्हणून उपस्थित होते.
याशिवाय, स्थानिक आमदार श्री. मुरजी पटेल, ऑस्कर पुरस्कार विजेते प्रख्यात गायक श्री. सुखविंदर सिंग, ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते श्री. अन्नू कपूर, पद्मभूषण प्रा. डॉ. ए. बी. मेहता आणि पद्मश्री प्रा. डॉ. सी. व्यंकट एस. राम या नामांकित हृदयरोग तज्ज्ञांनी विशेष उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमा दरम्यान ‘जय हो’ फेम गायक सुखविंदर सिंग यांनी सादर केलेल्या मंत्रमुग्ध गाण्यांनी संपूर्ण परिषदेत एक वेगळेच चैतन्य निर्माण केले.
गुरुकृपा हार्ट फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल, पुष्पगुच्छ, स्मृतीचिन्ह, चांदीची समई आणि श्री गणेशाची मूर्ती देऊन आदरातिथ्यपूर्वक स्वागत केले.
या प्रसंगी नगरसेवक श्री. प्रकाश मुसळे, क्रिकेटपटू रोहित शर्माचे प्रशिक्षक श्री. दिनेश लाड यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज डॉक्टर्स आणि शासकीय अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
▪️हृदयरोग शास्त्रातील अद्ययावत तंत्रज्ञानावर चर्चा-
या परिषदेत जागतिक कीर्तीच्या १६ तज्ज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शक सत्रे घेतली. हृदयरोग शास्त्रातील अद्ययावत घडामोडी, नवीन संशोधन आणि प्रगतीवर यात सखोल चर्चा झाली.
प्रमुख वक्त्यांमध्ये डॉ. ए. बी. मेहता, डॉ. सी. व्यंकट एस. राम, डॉ. गजानन रत्नपारखी, डॉ. दर्शन झाला, डॉ. विवेक मेहान, डॉ. गिरीश परमार, डॉ. सदानंद शेट्टी, आणि डॉ. एस. आंबर्डेकर यांचा समावेश होता. त्यांची सत्रे उपस्थितांसाठी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि प्रभावी ठरली.
ही परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. गजानन रत्नपारखी यांच्यासोबतच डॉ. स्मृती रत्नपारखी, डॉ. राम चव्हाण, डॉ. अनिल कुमार उल्गडी, डॉ. शशांक शहा, डॉ. राजेश तिवारी, डॉ. अश्विनी चव्हाण, डॉ. प्रियंवदा (अध्यक्ष, अंधेरी मेडिकल असोसिएशन), डॉ. मोना गांधी, डॉ. सीमा तिवारी, डॉ. नीता ममतौरा (अध्यक्ष, मेडिकल क्लब ऑफ विलेपार्ले), डॉ. गजानन काटे, डॉ. दिपाली काटे, श्री. सागर पांढरे, डॉ. स्मिता पाटील, डॉ. समीर पाटील, डॉ. सुहास वोरा, डॉ. प्रशांत शिंदे (अध्यक्ष, KSDA) आणि डॉ. येवले (अध्यक्ष, GMA) यांसह संपूर्ण टीमने मोलाचे योगदान दिले.













