मंगलमय सणांचे स्वागत करताना गुंतवणुकीच्या उत्तम संधी
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा दिवाळी ठेव योजनेचा आज शुभारंभ होत आहे. ४५५ कोटींच्या ठेवी, ३१७ कोटींचे कर्ज, २०१ कोटीच्या बँक गुंतवणुका अशी भक्कम आर्थिक स्थिती घेऊन दसरा दिवाळी ठेव योजना स्वरूपानंद पतसंस्था आपल्या सर्व गुंतवणूकदारांसाठी अत्यंत आकर्षक, सुरक्षित ठेव योजना घेऊन आली आहे. या ठेव योजनेत गुंतवणूकदारांनी मोठी गुंतवणूक संस्थेमध्ये करावी असे विनम्र आवाहन ॲड.दीपक पटवर्धन करत आहेत.
स्वरूपानंद पतसंस्थेने आपले आर्थिक व्यवहार अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सर्व आर्थिक निकष सांभाळत वाढवत नेले असून संस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये कमालीचे सातत्य राखले आहे आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची ठरते. २८% पर्यंत भांडवलपर्याप्तता, ठेवी कर्जाचे ६३% आदर्श प्रमाण, एस.एल.आर गुंतवणुकीचे २५% चे प्रमाण, निर्माण केलेल्या अन्य निधीची १००% गुंतवणुकीसह सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५९ कोटी ३९ लाख एवढा भरवक्कम स्वनिधी अशी आर्थिक आकडेवारी ठेवीदारांना सुरक्षिततेची हमी देत आहे. या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांसाठी संस्थेने स्वरुपांजली ठेव योजना १६ ते १८ महिने सर्वसाधारण ८.२५% व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.५०%, सोहम ठेव योजना १९ ते ३६ महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ८.५०% व ज्येष्ठ नागरिक / महिला ८.७५% या ठेव योजना घोषित केल्या आहेत.
५० हजारांच्या घरात असलेली सभासद संख्या ही गोष्टही संस्थेचे जनमानसातील स्थान सांगण्यासाठी पर्याप्त आहे.
स्वामी स्वरूपानंदच्या वरील ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करून ठेवीदारांनी स्वरूपानंद पतसंस्थेच्या स्वरूप अर्थ परिवारात सहभागी होऊन सुरक्षित आणि आकर्षक परताव्याचे लाभार्थी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी केले आहे













