जिजाऊ संस्थेच्या वतीने मंडणगडमध्ये १४ ऑक्टोबरला ‘स्वळ भळणाचा’ कार्यक्रमाचे आयोजन

मराठमोळा साज, पेठणीचा नाज आणि खेळांची मेजवानी; नवरात्रोत्सवानिमित्त महिलांसाठी विशेष कार्यक्रम

मंडणगड प्रतिनिधी : जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र, विभाग रत्नागिरी केंद्र मंडणगड यांच्या वतीने नवरात्रोत्सवानिमित्त बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ८ .०० वाजता ‘खेळ पैठणीची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंडणगड येथील साईनगर उत्कर्ष मंडळ, साईनगर येथे हा कार्यक्रम होणार आहे.
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडविणे, महिलांना एकत्र येण्याची संधी उपलब्ध करून देणे तसेच मनोरंजनाच्या माध्यमातून उत्सवाचा आनंद द्विगुणित करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. ‘मराठमोळा साज, पेठणीचा साज, खेळूया मिळून आज!’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषा आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रमांची रंगत अनुभवायला मिळणार आहे.
या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. निलेश भगवान सांबरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे सचिव केदार चव्हाण आणि रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मांडवकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मंडणगड परिसरातील नागरिकांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची माहिती :
बुधवार, १४ ऑक्टोबर २०२६
वेळ सायंकाळी ८ वाजता
स्थळ साईनगर उत्कर्ष मंडळ, साईनगर, मंडणगड
संपर्क केदार चव्हाणल अ‍ॅड. महेंद्र मांडवकर निलेश रक्ते