भार्गव ठाकुरची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड!

▪️मैदानी स्पर्धेत बागवे हायस्कुलचे यश

मसुरे | झुंजार पेडणेकर क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत आर. पी. बागवे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे.

शिरवंडे येथे झालेल्या स्पर्धेत भार्गव शैलेश ठाकूर (१४ वर्षे वयोगट – मुले) याने

गोळा फेक द्वितीय क्रमांक, उंच उडी द्वितीय क्रमांक पटकवला आहे.

या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

कु. श्रेया महेश वंजारे (१४ वर्षे वयोगट – मुली) हिने मैदानी स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला. यशस्वी विध्यार्थ्यांना श्री. रमेश पाताडे, श्रीमती जाधव मॅडम आणि श्री. समीर नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. संस्था अध्यक्ष डॉ दीपक परब, सचिव प्रसाद बागवे, मुख्याध्यापिका सौ. मसुरेकर, लोकल कमिटीचे अध्यक्ष श्री. राजन परब आणि मुंबई कमिटीचे उपाध्यक्ष श्री. उत्तम राणे यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि यशस्वी विध्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.