कणकवली : ओरोस येथे झालेल्या मैदानी स्पर्धेत १७ वर्ष मुली ४/१०० अडथळा शर्यतीमध्ये नरडवे इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी रींकी गणेश गावकर हिचा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक आला.तिची विभाग स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तर १४ वर्ष मुले गोळा फेकमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक आर्यन नामदेव कदम याचा आला आहे. जिल्हास्तरीय कँरम स्पर्धेसाठी ३ विद्यार्थीची निवड झाली आहे. १७ वर्षाखालील मुले भौमिक हनुमंत सावंत तृतीय क्रमांक, १४ वर्ष मुली शुभ्रा रमेश कदम ५ वा क्रमांक व सारा विठ्ठल खंडवी ६ वा क्रमांक मिळविला आहे. या सर्व यशस्वी खेळाडूंचे शाळेच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी , पालक, संस्था , शालेय समिती , पालक आणि क्रीडा प्रेमींकडून त्यांचे कौतुक होत आहे.सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक व्ही. के. खंडवी यांचे मार्गदर्शन लाभले.













