खेड (प्रतिनिधी) : खेड शहरातील श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांनी मंदिराला सदिच्छा भेट देऊन श्रीकृष्णाचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतले. त्यांच्या या भेटीमुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी मंदिर उत्सव समितीचे अध्यक्ष संजय मोदी यांनी रामदासभाई कदम यांचे स्वागत करून त्यांना सन्मानित केले. मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर त्यांनी आवर्जून भेट देत दर्शन घेतल्याबद्दल संजय मोदी यांनी मंदिर उत्सव समितीच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त केले.
या प्रसंगी मंदिर उत्सव समितीचे उपाध्यक्ष अतुल शेठ, माजी पदाधिकारी शैलेश सुरा, रवींद्र मेहता, अरविंद तलाठी, आप्पा मेहता, विलासभाई बुटाला, महिला अध्यक्ष बिनाताई गांधी, मीनाताई तलाठी, वृषालीताई तलाठी, स्नेहिता कोठारी, नयन धारिया, राजन देसाई, अजयभाई धारिया यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
तसेच खेड शहर शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला पदाधिकारी व समाजातील महिलांनीही या कार्यक्रमाला उत्स्फूर्त उपस्थिती लावली. श्रीकृष्ण मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर झालेल्या या सदिच्छा भेटीमुळे मंदिर समिती आणि भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.













