“आयडॉल शिक्षक पुरस्कार” शिरोडा खर्डेवाडी शाळेचे शिक्षक सुनिल वाघ यांना जाहीर…

वेंगुर्ले : प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाने नुकतीच आयडॉल शिक्षक पुरस्कार यादी जाहिर केली. त्यामध्ये खर्डेवाडी (शिरोडा) येथील जिल्हा परिषद शाळेचे उपक्रमशील शिक्षक सुनिल वाघ यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे खर्डेवाडी शिरोडा परिसरासह संपूर्ण शिक्षण क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शिक्षक सुनिल वाघ यांनी आपल्या अध्यापन शैलीत नवनवीन प्रयोग करत विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या शिखरावर पोहोचवले आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, डिजिटल क्लासरूमचा प्रभावी वापर, विद्यार्थ्यांमधील कला-कौशल्यांना वाव देण्यासाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सामाजिक बांधिलकीतून शाळेचा केलेला कायापालट या त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय समोर ठेवून काम करणाऱ्या श्री.सुनिल वाघ यांनी ग्रामीण भागातील शिक्षण अधिक रंजक आणि दर्जेदार बनवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या यशामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी, ग्रामस्थ, सहकारी शिक्षक आणि पालकांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.