चौके l प्रतिनिधी : ‘वंदे मातरम्’ला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारच्या वतीने कर्नाटकातील म्हैसूर येथे राष्ट्रीय युवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात महाराष्ट्र,राजस्थान,गोवा, तामिळनाडू आणि केरळ या पाच राज्यांतील १५० युवक-युवती सहभागी झाले होते.
या शिबिरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ऍडव्होकेट ऐश्वर्य मांजरेकर, भाग्यश्री मांजरेकर,फिजा मखानदार आणि श्रावणी संजय गावडे यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.
उत्स्फूर्त वक्तृत्व वादविवाद स्पर्धेत श्रावणी गावडे हिने Best Individual Speaker म्हणून प्रथम क्रमांक पटकावला. तसेच पोस्टर मेकिंग व प्रेझेंटेशन स्पर्धेत श्रावणी सहभागी असलेल्या मिश्र गटाने प्रथम क्रमांक मिळवला. ‘नशामुक्त भारत’ विषयावर समूहाने संगीत नाटिका सादर केली.
सांस्कृतिक कार्यक्रमात श्रावणीने लावणी, तर सत्कार समारंभात कोळी नृत्य सादर करून महाराष्ट्राच्या लोककलेचे दर्शन घडवले. या यशाबद्दल चारही सहभागींचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.
*चौके पंचक्रोशीतून श्रावनी गावडे हिचे विशेष अभिनंदन*
श्रावनी संजय गावडे ही चौके येथील सर्वसामान्य कुटुंबातील असून शालेय माध्यमिक शिक्षण चौके हायस्कूल येथे घेतले होते.सद्या श्रावनो सावंतवाडी SKP कॉलेज मध्ये LLB द्वितीय वर्ष शिक्षण घेत असून याच बरोबर चौके हायस्कूल माजी विद्यार्थी मंच यांच्यामार्फत चौके हायस्कूल येथे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करत आहे. श्रावनी लहानपणापासून हुशार असल्याने जिल्हा पातळीवर अनेक वक्तृत्व स्पर्धेत,नृत्य स्पर्धामध्ये सहभाग घेऊन यश संपादन केले होते. वंदे मातरंमला 150 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारत सरकारच्या वतीने कर्नाटक मैसूर येथे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मिळवलेले यश अभिमानास्पद असून चौके हायस्कूल माजी विद्यार्थी मंच तसेच वावळ्याचे भरड भराडी कला क्रीडा विकास मंडळ, मुंबई मंडळ व पंचक्रोशीतून श्रावनी वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.













