श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात भक्तिभावाने सहभाग
समस्त मालवणवासीयांच्या सुख-समृद्धी व कल्याणासाठी ग्रामदैवतांच्या चरणी केली प्रार्थना
मालवण | प्रतिनिधी : मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्यात आमदार निलेश राणे यांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. यावेळी दोन्ही ग्रामदैवतांचे मनोभावे दर्शन घेऊन त्यांनी समस्त मालवणवासीयांच्या सुख-समृद्धी, आरोग्य, शांतता आणि कल्याणासाठी श्रीचरणी प्रार्थना केली. मालवणच्या धार्मिक परंपरेत विशेष महत्त्व असलेल्या या पालखी सोहळ्यात लोकप्रतिनिधींसह नागरिक व भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले होते.
मालवणच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या श्री देव रामेश्वर व श्री देव नारायण यांच्या वार्षिक पालखी प्रदक्षिणा सोहळ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये विशेष उत्साह असतो. श्रद्धा, भक्ती आणि ग्रामदैवतांप्रती असलेल्या अतूट नात्याचे दर्शन या सोहळ्यातून घडते. अशा भक्तिमय वातावरणात आमदार निलेश राणे यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेत मालवणवासीयांच्या सर्वांगीण कल्याणाची प्रार्थना केली. यावेळी आमदार निलेश राणे यांनी अनेक व्यापारी बांधवांची भेट घेऊन संवाद साधला. अनेक नागरिक यांनीही आमदार निलेश राणे यांच्या सोबत फोटो सेल्फी काढले.
यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख राजू बिडये, क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, नगरसेविका शर्वरी पाटकर, अन्वेषा आचरेकर, पंकज सादये, अश्विनी कांदळगावकर, मेघा सावंत, निना मुंबरकर, ललित चव्हाण, कुडाळ नगरसेवक अभि गावडे, विश्वास गांवकर, संग्राम साळसकर, किसन मांजरेकर, अखिलेश शिंदे, अभय कदम, भाई मांजरेकर, मनोज हडकर यांच्यासह नागरिक व भाविक उपस्थित होते.











