वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी हुल्मेखवाडी वसंत वासुदेव पेडणेकर (वय ८९) यांचे शुक्रवार, दि. १३ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजता राहत्या घरी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.
पखवाज वादक, संगीत शिक्षक तसेच श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे चे सहाय्यक शिक्षक श्री. निलेश पेडणेकर यांचे ते वडील तर
डाँ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ च्या सहाय्यक शिक्षिका सौ. स्वप्नाली पेडणेकर यांचे ते सासरे होय. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुली, जावयी, नातवंडे असा परिवार आहे.











