रामगड येथील पाडूरंग घाडीगांवकर बेपत्ता

आचरा

रामगड देऊळवाडी येथील रहिवासी असलेले पांडुरंग गंगाराम घाडीगावकर वय 84 हे 28 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणासही काही न सांगता निघून गेले.किंवा पांडुरंग घाडीगांवकर यांचे त्यांच्या राहत्या घरातून कुणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी अपहरण केले आहे अशी तक्रार त्यांचा मुलगा संजय पांडुरंग घाडीगांवकर वय 55 याने दिल्यावरुन आचरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.

याबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास आचरा पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे . अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातीवले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार करवंजे हे करत आहेत.