दुर्गवाडी येथे घरकुल मंजुरीच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेची फसवणूक; ८० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास

तहसील कार्यालयातून आल्याचे सांगत घरकुलासाठी दोन हजार रुपये वसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख कागदपत्रांची मागणी;

मंडणगड(प्रतिनिधी) : मंडणगड शहरातील दुर्गवाडी येथे घरकुल योजनेत घर मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ महिलेची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरकुल मंजुरीसाठी दोन हजार रुपये, फोटो व आधारकार्ड लागणार असल्याचे सांगून विश्वास संपादन करत अज्ञात इसमाने सुमारे ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची तक्रार मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरेश बैकर (वय ४५, रा. घर क्रमांक ४७८, दुर्गवाडी, ता. मंडणगड) यांच्या आई कलावती बैकर वय ८० या घरी एकट्याच असताना २५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३.३० ते ३.४५ वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी इसम त्यांच्या घरी आला. आपण मंडणगड तहसीलदार कार्यालयातून आलो असून, तुम्हाला घरकुल मंजूर झाले आहे, असे सांगून त्याने फिर्यादी यांचे आईचा विश्वास संपादन केला. मंजुरीसाठी दोन हजार रुपये भरावे लागतील, तसेच फोटो व आधारकार्ड आवश्यक असल्याचे त्याने सांगितले. पैसे नसल्यास गळ्यातील बोरमाळ द्या, असे सांगून त्याने ज्येष्ठ महिलेच्या अंगावरील सोन्याची बोरमाळ फसवणूक करून घेऊन पोबारा केला. या सोन्याच्या बोरमाळेचे वजन सुमारे १५ ग्रॅम असून तिची किंमत अंदाजे ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी गुन्हा रजिस्टर क्रमांक १३६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३१६(२) व ३१८(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताची ओळख सुरेश सुरक्या गवसकर (वय ४७, रा. पोस्ट नागाव, ता. माणगाव, जि. रायगड) अशी निष्पन्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. संशयित पोलीसांचे ताब्यात असुन चोरीची मुद्देमाल हस्तगंत करण्यासाठी पोलीसांनी पुढील प्रक्रीया सुरु केली आहे. दरम्यान चोरीच्या वाढत्या घटनांचे पार्श्वभूमीवर
नागरिकांनी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये!
शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली कोणीही पैसे किंवा सोन्याचे दागिने मागितल्यास नागरिकांनी सावध राहावे. कोणत्याही शासकीय योजनेची माहिती संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन खात्री करूनच घ्यावी, असे आवाहन पोलीस निरिक्षक भरत धुमाळ यांनी केले आहे.