दापोलीतील सलूनमध्ये ग्राहकाला दाढी करत असताना व्यावसायिकाला मारहाण व धमकी

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील मौजे गावतळे हनुमानवाडी येथे सलूनमध्ये ग्राहकाची दाढी करत असताना फिर्यादी शुभम संतोष शिंदे हे पाठमोरे असल्याची संधी साधून संशयित आरोपी सौरभ भार्गराम म्हाब्दी याने दारू पिऊन येत लाकडी रिपने (लाकडी पट्टीने) त्यांच्या पाठीवर व डाव्या हाताच्या पंजावर मारहाण करून दुखापत केली. तसेच संशयित आरोपीने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घडली. या हल्ल्यात शुभम शिंदे हे जखमी झाले असून या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.