मंडणगड तालुक्यात शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या विविध पदांवर सात जणांच्या नियुक्त्या जाहीर!

बाणकोट, भिंगळोळी, देव्हारे, इस्लामपूरसह मंडणगड शहरातील पदाधिकाऱ्यांचा समावेश

मंडणगड (प्रतिनिधी) : शिवसेना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्यासाठी मंडणगड तालुक्यात शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या विविध पदांवर सात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तसेच राज्याचे मंत्री ना. योगेश कदम यांच्या सूचनेनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. शिवसेना सोशल मीडिया उपप्रमुख प्रतीक शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कोकण विभागातील संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या उद्देशाने या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिवसेना सोशल मीडिया कोकण विभागप्रमुख पराग मोहिते यांनी १९ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नियुक्त्यांची घोषणा केली. यामध्ये मंडणगड तालुक्यातील विविध जिल्हा परिषद व पंचायत समिती गणांसह मंडणगड शहरासाठी पुढील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवनियुक्त पदाधिकारी पुढीलप्रमाणे श्री. सूरज घोसाळकर बाणकोट जिल्हा परिषद गणप्रमुख. श्री. ऋतिक पाटील भिंगळोळी जिल्हा परिषद गणप्रमुख. श्री. नीरज कांबळे भिंगळोळी पंचायत समिती गणप्रमुख.
श्री. किरण माळी देव्हारे पंचायत समिती गणप्रमुख. श्री. मोहम्मद उंडरे बाणकोट पंचायत समिती गणप्रमुख. श्री. विश्वजीत सावंत इस्लामपूर पंचायत समिती गणप्रमुख. श्री. पियुष सापटे मंडणगड शहरप्रमुख. या नियुक्त्यांमुळे मंडणगड तालुक्यात शिवसेनेच्या सोशल मीडिया संघटनेला अधिक बळ मिळणार असून, पक्षाची ध्येयधोरणे, शासनाच्या विविध योजना, विकासकामे तसेच जनहिताचे उपक्रम सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यास मदत होणार आहे. नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचे शिवसेना तालुका प्रमुख प्रताप घोसाळकर, युवासेना तालुका अधिकारी विकास पवार व शिवसेना सोशल मीडिया विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या आगामी सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.