लोकागीतात मुली प्रथम तर लोकनृत्यात मुलगे द्वितीय
गौरव पोंक्षे माखजन :
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या ॲड.पी.आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व माखजन इंग्लिश स्कूल माखजन च्या विद्यार्थी रत्नागिरी येथे झालेल्या विविध जिल्हा स्तरीय स्पर्धानमध्ये चमकले आहेत.
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे यंदा विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग(व्ही.बी.वाय.एल.डी २०२७) मध्ये रूपांतरण करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,रत्नागिरी यांचे तर्फे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महोत्सवात १५ ते २९ वर्षे वयोगटातील अनेक तरुण तरुणी या महोत्सवात विविध स्पर्धात सहभागी झाले होते.यामध्ये ॲड.पी.आर.नामजोशी कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व माखजन इंग्लिश स्कूल च्या विद्यार्थ्यांनी लोकगीत स्पर्धे मध्ये मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला.तर लोकनृत्य स्पर्धेत मुलग्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.तर चित्रकला स्पर्धेत सिमरन चांदिवडे हिने द्वितीय क्रमांक मिळवला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रा.आरजू बेग,गणेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक महादेव परब,पर्यवेक्षक अंबादास घाडगे,संस्था अध्यक्ष शशिकांत घाणेकर,उपाध्यक्ष राजेश फणसे व अन्य संचालकांनी अभिनंदन केले आहे.शिवाय परिसरातून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.













