आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी आदित्य जाधवची निवड

 आ. शेखर निकम यांच्याकडून कौतुकासह सहकार्य!

चिपळूण (प्रतिनिधी) : आकले गुरववाडी येथील अवघ्या १७ वर्षीय आदित्य प्रदीप जाधव याने आपल्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्याची राज्यस्तरावर निवड झाली असून, हरियाणा येथील दवलतपूर येथे ८ ते १० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या चौथ्या इंटरनॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत तो सहभागी होणार आहे.
आदित्य हा सध्या इयत्ता बारावीमध्ये वाणिज्य शाखेत शिक्षण घेत आहे. कमी वयात मिळवलेल्या या यशाबद्दल आ. शेखर निकम यांनी त्याचे विशेष कौतुक केले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील सहभागासाठी आमदार निकम यांनी मोलाचे सहकार्य व मदतीचा हात दिला. यावेळी आमदार शेखर निकम यांनी आदित्यचे अभिनंदन करून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. आदित्यने स्पर्धेत उत्तम कामगिरी करून आपल्या गावाचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी स्वप्नील शिंदे आणि दिनेश शिंदे उपस्थित होते.