अखंड जुवळेवाडीची परंपरा
गौरव पोंक्षे माखजन :
तुलसी विवाहादिनी आंबव पोंक्षे गावात वाघ बारस आजही मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते.येथील बाळ गोपाळ सेवा मंडळ अखंड जुवळे वाडी आजही. ही परंपरा कायम ठेवताना दिसत आहे.
पूर्वी सह्याद्रीच्या परिसरात जंगलांचे प्रमाण मोठे होते. गावातील गुरेढोरे जंगलात चरायला जात असत. त्या काळात वाघ आणि इतर हिंस्र प्राण्यांपासून गुरांचे संरक्षण करणे हे मोठे आव्हान होते.
यावेळी गुरांचे संरक्षण व्हावे यासाठी वाघासह अन्य हिंस्त्रक प्राण्यांना गावातील लोक एकत्र येऊन सिमेपलीकडे पळवून लावण्याची प्रथा आहे.हिच प्रथा आजही जपली जात आहे.
वाघबारसची परंपरा श्रीकृष्णाच्या द्वापारयुगातील काळातच सुरू झाली अशी अनेकांची श्रद्धा आहे.
श्रीकृष्णाचा संबंध गायी, गुरेढोरे आणि गोपालन संस्कृतीशी होता.
श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केल्याची कथा भागवत पुराणात येते.
श्रीकृष्णाच्या काळात गोकुळ-वृंदावन परिसरात गोपालनाला विशेष महत्त्व होते.
वाघ,सिंह,बिबटे व हिंस्त्रक प्राण्यांना पळवून लावण्याची प्रथा या द्वापार युगातच सुरु झाल्याचे अनेक जाणकार सांगतात.
आंबव पोंक्षे येथील वाघबारस वेळी छोट्या छोट्या मुलांना वाघाचे मुखवटे लावून सजवण्यात आले होते.व त्यांना पिटाळत वेशी पर्यंत नेण्यात आले.यावेळी लहानांसह थोरामोठ्यांनी मजा लुटली.यावेळी निलेश भायजे, राजेंद्र जाधव,विष्णू बोले,शांताराम घवाळे,विजय बोले,मयुरेश मांडवकर,कृष्णा भायजे,सुभाष जुवळे,विराज जुवळे,निखिल जुवळ विष्णू भायजे.यासंह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.वाघ बारस पाहण्यासाठी ठिकाठिकाणी ग्रामस्थ आनंद घेण्यासाठी उभे होते.वाघ बारस केल्यानंतर डोंगरातच वनभोजन करण्यात आले.
वाघबारस परंपरा आजही श्रद्धेने आंबवं पोंक्षे गावात साजरी केली जाते.












