ओटवणे परिसरात सकाळीच चर्चा रंगली भल्या मोठया माकडाची.

ओटवणे (प्रतिनिधी ) ओटवणे परिसरात पहाटेच एका भल्या मोठ्या माकडाची एन्ट्री झाली आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. हा माकड ओटवणे मंदिराकडून विलवडे मार्गे सरळ रस्त्याने चालत जात असल्याचे दिसताच ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच आज शनिवार असल्याने रस्तावरून सकाळी चालत शाळेत जाणारी मुले या मुळे पालक वर्गातही भीती निर्माण झाली होती.मात्र शाळेच्या वेळेअगोदर हा माकड शाळा परिसरापासून दूर गेल्याने अनर्थ टळला. हे माकड इतर माकडांच्या तुलनेत थोडे वेगळे, अजस्र आणि आक्रमक वाटत असल्याने हा माकड या परिसरातील नसल्याने नेमका तो कुठून आला,एखाद्या मोठया जंगलातून निवारा शोधत भटकत तर आला नसावा असा प्रश्न निर्माण होत आहे. आधीच मडूरा रेडकरवाडी येथिल दुचाकिंच्या आरशाची तोडफोड करणाऱ्या वेडसर माकडाची घटना ताजी असताना ओटवणे परिसरात या भल्या अजस्र आणि विचित्र माकडाची गावातून सरळ रस्त्याने एन्ट्री झाल्याने ग्रामस्थामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.काहींनी या माकडाचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तींच्या अंगावर हे माकड धावत गेल्याचीही घटना घडली.हें माकड कारिवडे, दाणोली माडखोल जंगल परिसरातून आले असल्याचा काहींनी अंदाज व्यक्त केला.मात्र हा फक्त अंदाज आहे. यातील नेमक सत्य काय याची माहिती कुणालाच नाही.आधीच हत्ती,गवे,या जंगली प्राण्यांच्या जाचाला कंटाळलेल्या ग्रामस्थांसमोर अजून एका जंगली जनावरांची भर तर पडणार नाही ना अशी चर्चा रंगू लागली आहे.तर अशा जंगली जनावरांचा बंदोबस्त वनविभागाने करावा अशीही मागणी जोर धरत आहे.