मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा वाहतुकीसाठी बंद; वाहतूक जुन्या घाटातून वळवली
खेड – रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीमुळे बोगद्यात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तब्बल अडीच किलोमीटर लांबीच्या कशेडी बोगद्याच्या दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
ट्रकला लागलेल्या आगीमुळे बोगद्यात प्रचंड धूर पसरला असून, गेल्या एक तासापासून बोगद्यातील वाहतूक ठप्प आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक आता जुन्या कशेडी घाटातून वळवण्यात आली आहे.
बोगद्यातील धूर आणि आगीची परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक बंद ठेवण्यात आली असून, बोगद्यातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी जुन्या कशेडी घाटाचा पर्यायी मार्ग वापरावा.
कशेडी बोगद्यातील आगीमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.














